• 6 years ago
कमल शिंदेंचे मुंडी भाजण्याचे काम देते प्रेरणा
कोल्हापूर : संभाजीनगरच्या रेसकोर्सनाक्‍याजवळ एक पत्र्याचे खोपटं, खोपटात एका कोपऱ्यात गॅसचा छोटा सिंलेडर, शेजारी त्याच्या हिटरचा जाळ आणि या जाळात हसतमुखाने मुंडी भाजणारी एक माऊली. याच्यासमोरून जाताना अनेकजण मुंडीच्या वासाने नाके मुरडतात. पण त्या महिलेच्या जीवनात मात्र या मुंडीनेच प्रकाश आणला आहे. कमल मारूती शिंदे असे या महिलेचे नाव. तब्बल 30 वर्षे येथे मुंडी भाजून चरितार्थ चालविणाऱ्या कमल शिंदे. यादवनगर झोपडपट्टीत राहतात. दोन सुना, एक मुलगी आणि पाच नातवंडांचे कुटुंब एकट्या चालवतात.
कमल यांची घरची परिस्थिती बेताची. 1984 ला त्या लग्न करून यादवनगरात आल्या. पती मारूती शिंदे रेसकोर्स नाक्‍याजवळ स्टोव्ह दुरुस्ती व छत्र्या दुरुस्तीचे काम करत. त्याही त्यांच्यासोबत येऊ लागल्या. तेथेच त्या मुंडी भाजायला शिकल्या. सुरवातीला रॉकेलच्या हिटरने मुंडी भाजायच्या. कमी वेळात चोख मुंडी भाजणाऱ्या "कमल ताई' अशी त्यांची ओळख निर्माण केली. तीन मुलांनी पायावर उभे राहावे, यासाठीच त्यांची धडपड सुरू होती.
बातमीदार - नंदिनी नरेवाडी
व्हिडीओ - बी.डी.चेचर

Category

🗞
News

Recommended