• 6 years ago
पुणे - सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील साईराज गृहरचना संस्थेत सोमवारी पहाटे साडेपाच वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारील सदनिकेत राहणारी अस्मिता पंडित ही तरुणी अंगावर भिंत पडून मृत्यूमुखी पडली. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, त्यामुळे साईराज इमारतीला तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. गॅसगळती होऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Category

🗞
News

Recommended