• 6 years ago
पुणे - 'सकाळ'च्या "बालमित्र' पुरवणीवरील प्रेमापोटी नऊ वर्षे वयाच्या सुयश कदम याने मोबाईलवर लहानशी फिल्म्‌ तयार केली आहे. 'बालमित्र' पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या प्राणी-पक्ष्यांच्या चित्रांवर आधारित ही मोबाईल फिल्म आहे. सुयश मांजरी येथील होली रॉंजल्स स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकतो. त्याचे वडील गणेश कदम यांनी सांगितले की, तंत्रज्ञान वापरण्यात सुयशची हुशारी नेहमी जाणवते. मोबाईल, इंटरनेट तो सहज हाताळतो.

Category

🗞
News

Recommended