मराठी साहित्य प्रेमींसाठी वेबरुपी मेजवानी
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे राज्यातील संस्कृतीतील मानाचा तुरा. यंदा संमेलनाचं ८३ वं वर्ष आहे. २६ ते २८ मार्चदरम्यान होणारं हे संमेलन अनेकदृष्टीनं मराठी साहित्य रसिकांच्या स्मरणात राहावं, यासाठी मराठी साहित्य परिषदेनं खास वेबसाइट तयार केली आहे. साहित्य प्रेमिकांसाठी मेजवानीच ठरू पाहणाऱ्या या वेबसाइटचं मंगळवारी प्रकाशन झालं.