रत्नागिरी - 'रत्नागिरी येथे प्रस्तावित अणू ऊर्जा प्रकल्पासाठी ग्रामस्थांच्या जमिनी बळजबरीने लाटल्या जात आहेत. जोपर्यंत या प्रकल्पात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत प्रकल्प सुरू करण्यास मनसेचा विरोध असेल. पोलिसी बळाचा वापर करून पुढे रेटायला हा प्रकल्प म्हणजे शाहरुख खान नाही,' अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकल्पावर टीका केली.