पुणे - फाल्गुन वद्य तृतीया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन. समकालीन व्यक्तींपासून आजच्या आधुनिक काळातील कलाकार आणि विचारवंतांपर्यंत सर्वांसाठीच शिवचरित्र हा प्रेरणेचा स्रोत ठरला आहे. अनेक भाषांमधून शिवरायांच्या जीवनचरित्राबाबत लिखाणही झाले आहे. त्यात कविता किंवा काव्यप्रकारही आलेच!