ध्वनी आणि स्पर्शाची अनोखी परीक्षा...
पुणे, ता. २२ - तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अंध विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा प्रयोग आज (सोमवार) पुण्यात झाला. "कम्युनिटी रेडिओ'च्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या या "ऑनलाईन' परीक्षा पद्धतीने अंध विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये मुलभूत स्वरुपाचा फरक पडू शकतो, असा विश्वास संयोजक सतीश नवले यांनी आणि सहभागी शिक्षक-विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. एकट्या पुणे शहरात सुमारे सहा हजार अंध विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षणासाठी ही पद्धत उपयोगी पडू शकणार आहे.