पुणे - शेवगाव (जि. अहमदनगर) येथील शिक्षक उमेश घेवरीकर व मफिज इनामदार यांनी समाजप्रबोधनासाठी एक तासाचा चित्रपट बनविला आहे. "राजयोगी भगवानबाबा' असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवाद लेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे गावातच करण्यात आल्याने शेवगावात तयार झालेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 13 जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.