• 6 years ago
आंतरराष्ट्रीय जलतरणस्पर्धेसाठी गरज आर्थिक मदतीची
डोंबिवली - डोंबिवलीत राहणाऱ्या सुखजीत कौर या जलतरणपटूची निवड तेराव्या फिना मास्टर ऍक्वॅटीक चॅंपियनशीपसाठी झाली आहे. ही स्पर्धा स्वीडनमध्ये गोट्‌सबर्ग येथे होणार आहे. मात्र भारताचे प्रतिनिधीत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करायची संधी मिळत आहे याचा आनंद साजरा करायचा की आर्थिक अडचणींमुळे या स्पर्धेवरच पाणी सोडायचे या संभ्रमात ही गुणी जलतरणपटू सापडली आहे. या स्पर्धेला जाण्यासाठी तिला तब्बल दीड लाख रूपयांची चणचण भासत आहे.

Category

🗞
News

Recommended