भटक्या मुलांसाठी स्थायी शाळा
प्रत्येक रेल्वे स्थानकावर भटकी मुलं नजरेस पडतात. ही मुलं मोठी झाल्यावर वाईट मार्गाला लागतात. त्यामुळं त्यांना शिक्षण देऊन आदर्श नागरिक घडविण्याच्या उद्देशानं नागपूर महापालिकेनं प्लॅटफार्म ज्ञान मंदिर ही निवासी शाळा सुरु केलीय. देशातला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. महापालिकेनं सामाजिक जाणिवेतून सुरु केलेल्या या उपक्रमाचं नितीन गडकरी यांनी कौतुक केलं.