पुणे - येथील कॅंप भागातील रोझरी शाळेने विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. वाढीव शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बाकांवर उभे राहण्याची शिक्षा करण्यात येत असल्याची तक्रारी अनेक पालक व विद्यार्थ्यांनी आज (सोमवार) केली. शाळेने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पालकांनी गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन पुकारले असताना शाळेत असे प्रकार घडत आहेत.