'एफ एम' रेडिओवर मराठी सूर ! (व्हिडिओ)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अखेर मराठी गाणी लावण्याचं 'एफ एम' रेडिओ वाहिन्यांनी मान्य केले. त्यापैकी एक वाहिनी टॉप तेरा मराठी गाणी वाजवणार आहे. तर दुसऱ्या एका वाहिनीवर नव्या जुन्यांचा संगम असणार आहे.
मुंबईतल्या आणि राज्यातल्या खासगी एफएम वाहिन्यांना मराठीचं एवढं वावगं का असा सवाल करत संगीतकार कौशल इनामनदार यांनी याविरोधात आवाज उठवला आणि त्याला हजारो संगीतप्रेमींनी आपला पाठिंबा दिला. एफएमवाल्यांनी मराठी गाणी न लावल्यास त्यांना मिर्चीची धुरी देऊ अशी तंबी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्यानंतर अखेर एफएमवाले नमले आहेत. वाहिनीवर मराठी गाणी लावण्यास अखेर एफएमवाले तयार झाले आहेत.