वैष्णवांच्या गर्दीने आला चंद्रभागेस भक्तीचा महापूर
पंढरपूर - झळझळीत सोमकळा।कळस दिसतो सोज्वळा।। चंद्रभागेत स्नान, वाळवंटात रंगलेल्या दिंड्यांच्या हजेऱ्या आणि कळसाचे मनोभावे दर्शन घेऊन लाखो वैष्णवांनी "देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो' असा भाव मनी बाळगत आज विठुरायाच्या चरणी आपली आषाढी वारी समर्पित केली. वैष्णवांनी स्नानासाठी केलेल्या गर्दीने चंद्रभागेला जणू भक्तीचा महापूर आला होता.