• 6 years ago
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्रीडापटू चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांना आम्ही साह्य करू. क्रीडातज्ज्ञांनी, क्रीडा संघटक, दिग्गज क्रीडापटूंनी सूचविल्यास राज्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसंगी राज्याबाहेरूनही चांगले प्रशिक्षक नियुक्त करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तेजस्विनी सावंतच्या सत्काराच्या वेळी दिली. त्यानंतर काही वेळातच राज्यातील नवोदित नेमबाज विक्रांत घैसास याची आई अनघा यांनी मंचावर येत केंद्रीय क्रीडा खात्याने ऐनवेळी नियम बदलल्यामुळे माझ्या मुलासह अनेक मुले स्वखर्चाने जागतिक स्पर्धेसाठी गेली. आपण जगज्जेत्यांचे कौतुक करतो; पण स्पर्धेपूर्वीही साह्य करायला हवे, अशी मागणी जाहीरपणे करीत सर्वांना धक्का दिला.

Category

🗞
News

Recommended