• 6 years ago
राहूल आणि प्रियांका उतरणार रॅम्पवर?
आपण फॅशन शो नेहमीच पाहतो...रोषाणाईनं झगमगत्या रॅम्पवर फिल्मि हस्ती अवतरणं हे नित्याचंच.... पण एखादा राजकीय नेता रॅम्पवर उतरल्याचं ऐकण्यात नाही आणि त्यातच राहूल गांधींसारखा कॉंग्रेसचा युवराज रॅम्पवर उतरला तर थोडं आश्चर्य वाटेल.. पण हे खरंय. कोलकाता फॅशन वीकच्या फिनालेमध्ये राहूल गांधी आणि प्रियांका गांधी रॅम्पवर उतरणार आहेत, अर्थात याला दुजोरा मिळालेला नाही पण महात्मा गांधींना समर्पित होणार्‍या या फॅशन वीकमध्ये खादीचं स्पेशल प्रमोशन करण्यात येणार आहे आणि त्यामुळंच दोघांनीही रॅम्पवर उतरण्याची तयारी दाखवलीय.

Category

🗞
News

Recommended