धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार गोष्टींच्या प्राप्तीसाठी जीवन आहे व या गोष्टींच्या प्राप्तीसाठी शरीर हे प्रमुख साधन आहे. जे सतत झिजत असते ते शरीर. हे सतत झिजणारे शरीर उत्तम ठेवणे म्हणजेच आरोग्य उत्तम ठेवणे. हे प्रत्येकाचे प्रमुख कर्तव्य आहे. हे आरोग्य कसे सांभाळावे यासाठी व्यायाम, योग्य आहार, औषधी यांसारख्या उपाययोजना प्रत्येक जण करीत असतो. अशाच उपायांमधील अतिशय चांगला उपाय म्हणजे "अभ्यंग''!