केदार शिंदेबरोबर 'ऑन ड्युटी चोवीस तास' केल्यानंतर क्रांती रेडकर आता दिसणारे, महेश मांजरेकरांच्या 'शहाणपण देगा देवा' या सिनेमामध्ये. मनवा नाईकही यात एका वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. महेश मांजरेकरांसह अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, वैभव मांगले असे एक से बढकर एक विनोदवीर या शहाणपण देगा देवामध्ये आहेत. त्यामुळे अर्थातच हा कॉमेडीचा तडका प्रेक्षकांची करमणूक करेल, अशी आशा आहे. क्रांती रेडकर आणि मनवानेही ही फिल्म फुल्ल टू एन्जॉय केलीय. शूटिंगच्या वेळी काय-काय धमाल आली, ते या दोघींनी आमच्याशी शेअर केलंय. पाहूयात, आमचा प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे याने क्रांती आणि मनवाशी मारलेल्या या खासमखास गप्पा...