पुणे - २००७ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या धीरगंभीर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी मुलतानीमधील दोन बंदिशी,
'अवघाची संसार' ही भक्तिरचना आणि नंतर ठुमरी सादर केली होती. पंडितजी आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे अजरामर स्वर मात्र कायम राहणार आहेत. (व्हिडिओ - संतोष धायबर)