• 6 years ago
'छायाचित्रकारांचा राजा' हरपला
मुंबई - क्रिकेटपटूंपासून राजकारण्यांपर्यंत, उद्योगपतींपासून "सेलिब्रिटीं'पर्यंत कित्येकांना आपल्या जादूई कॅमेऱ्यात बंदिस्त करून त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविणारे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष (61) यांचे मंगळवारी (ता. 13) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने चर्नी रोड येथील घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच "छायाचित्रकारांतील राजा' हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Category

🗞
News

Recommended