• 6 years ago
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी कोणत्या ना कोणत्या सिनेमासाठी आपला केवळ आवाज दिलाय..कोणी सिनेमाचं सूत्रसंचालन केले आहे. तर, कोणी ऍनिमेशन सिनेमात कमाल दाखवली आहे. बिग बींच्या आवाजाची जादू तर सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळेच ते आता एका ऍनिमेटेड चित्रपटासाठी आपला आवाज देणार आहेत...तुम्ही विचाराल, यात काय विशेष?

विशेष हेच की महाभारतात पितामहची भूमिका करणाऱ्या मुकेश खन्ना यांच्या पात्राला अनिमेटड चित्रपटात बिग बी आवाज देणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती जयंतीलाल गडा करत आहेत. या चित्रपटासाठी ते एका दमदार आवाजाच्या शोधात होते, आणि सहाजिकच बिग बींपेक्षा दमदार आवाज त्यांना कुठे मिळाला असता...?
कोट्यवधी रुपयाचे बजेट असलेल्या या चित्रपटात बिग बींनी फी न घेता आपला आवाज देण्याचा निर्णय घेतला आहे...महाभारताच्या या ऍनिमेटेड प्रकारामध्ये बिग बींसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही वेगवेगळ्या पात्रांना आवाज देण्यासाठी गळ घातली आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडचे कलाकार सिनेमातल्या सगळ्या मुख्य पात्रांना आपला आवाज देणार आहेत...मोठ्या पडद्यावर आपल्या रागीट आणि लाऊड डायलॉगसाठी फेमस असणा-या सनी देओलला भीमच्या कॅरेक्‍टरला आवाज देण्यासाठी फायनल केले गेले आहे.
बिग बींसाठी भिष्म पितःमला आपला आवाज देणे हे काही कठीण काम नाही...मात्र, सनीसाठी हा पहिला वहिला अनुभव असेल. आणि ऍनिमेटेड चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदा सनीचा आवाज ऐकायला मिळणार आहे. या आधीही महाभारतावर अनेक सिनेमे आणि सिरिअल्सही येऊन गेल्या...काही वर्षांपूर्वी भीमचा मुलगा घटोत्कचच्या आयुष्याची कथा सांगणाराही एक चित्रपट आला होता...पण महाभारत या महाकाव्यावर पहिल्यांदाच एक ऍनिमेटेड चित्रपट येणार आहे. त्यात असणारेत बॉलिवूड स्टार्सचे आवाज...आशा करूया की या सगळ्या आवाजांसह बॉलिवूड स्टार्सनाही आपली एक वेगळी ओळख मिळेल...

Category

🗞
News

Recommended