स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातील बर्नार्ड वेबर या गृहस्थाच्या डोक्यातून २००१ मध्ये एक अफलातून कल्पना बाहेर पडली आणि त्याने नवीन सात आश्चर्यांसाठी जगभरातील नेटिझन्सची मते मागविली. ही परंपरा आजही चालू असून, ११.११.११ च्या गणिती मुहूर्तावर त्यांनी नव्या सात नैसर्गिक आश्चर्यांची यादी जाहीर केली आहे.