कर्णबधिर मुलांना बोलता यावं, यासाठी त्यांचे पालक शक्य ते सर्व प्रयत्न करतात. विविध डॉक्टरांकडे जाऊनही कधी कधी त्यांना उपाय सापडत नाही. अशा वेळी त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरतात...त्या अलका हुदलीकर. कानांवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी श्रवणयंत्र लावून त्या मुलांना बोलायला शिकवतात!!!