• 6 years ago
मुंबई - जर तुम्ही सलमान खानला बॉलिवूडचा दबंग समजत असाल, तर तुमचा हा गैरसमज काढून टाका. कारण जर सलमान शेर असेल, तर शाहरूखला सव्वा शेर म्हणावे लागेल. माझा चेहरा रोमॅंटिक असला तरी घाबरण माझ्या स्वभावात नसल्याचे त्याने सांगितले आहे.

हे केवळ त्याचे म्हणणे नाही. तर, एका पुरस्कार वितरण सोहळ्यात शाहरूखला चक्क फिअरलेस मेल ऑफ ऑल टाइम या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले आहे. अचानक हा पुरस्कार दिला गेल्याने सर्वांनाच आश्‍चर्य वाटले आहे. कारण दबंगगिरीत त्याने सलमानलाही मागे टाकले आहे.

Category

🗞
News

Recommended