सिंगापूर- एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्याला हळवे नाते टिकवून ठेवणे एक मोठे आव्हान असते. नात्यात आलेला दुरावा अधिक रुंदावत गेला की त्याचा परिणाम गंभीर असतो. परंतु, आता नवनवीन संशोधनांमुळे असे नाते टिकवून ठेवणे शक्य झाले आहे. सिंगापूरच्या एका रोबोटीक प्रोफेसरने मोशन सेन्सेटिव्ह इलेक्ट्रॉनिक लीप्स असलेले गॅझेट शोधून काढले आहे. हे गॅझेट कॉम्प्युटरला जोडून इंटरनेटच्या माध्यमातून लाखो-करोडो किलोमीटर दूर बसलेल्या जोडीदाराला किस करणे सहज शक्य झाले आहे.