""कसला "कूल जॉब' आहे गं तुझा? मस्त तयार होऊन स्टेशनवर पोचायचं आणि गाणी ऐकवायची, स्वतःही ऐकायची, गप्पा मारायच्या की झालं!'' तब्बल 2 वर्षांनी भेटलेल्या एका मैत्रिणीची ही प्रतिक्रिया मला काही नवीन नव्हती. महाराष्ट्रात खासगी एफएम रेडिओनं पहिला श्वास 2002 मध्ये घेतल्यापासून आजपर्यंत अशा अनेक गोड गैरसमजांना आम्हाला सामोरं जावं लागतं. रेडिओ चॅनेलचे "आरजे' नक्की करतात काय, त्यांचा कार्यक्रम कसा सादर होतो, असे अनेक प्रश्न लोकांना असतात. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन जाते आमच्या "माईक के पीछे!'