सातारा - छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचे पूत्र छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी 'सकाळ'ने दिलेल्या हाकेला ओ देत मदतीचे शेकडो हात पुढे आले आणि सुरू झाले श्रमदानातून किल्ल्याच्या विकासाचे नवे पर्व!