संग्राम जगताप- सकाळ वृत्तसेवा :
पुणे- 'शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीला कर्जमाफी देण्यात आली ते ठीक आहे. परंतु, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून स्वावलंबी बनवायचे असेल, तर कर्जमाफीच्या कुबड्यांचा उपयोग होणार नाही. त्यांना सामाजिकदृष्ट्या सन्मानाने वागविले पाहिजे. तसेच शेती व तंत्रज्ञानाविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन नवीन प्रयोगांसाठी बळ द्यायला हवे,' असे स्पष्ट मत अमेरिकी संशोधक ऍरन मॅकमलेन यांनी व्यक्त केले.
(व्हिडिओ- वृंदा चांदोरकर)