• 6 years ago
ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या जास्त त्रास होत असेल तर प्राणी-पक्ष्यांना. शहरांमधून दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्याकारणाने पक्षी आता शहरामधील इमारतींमध्येच त्यांची घरकुल उभारत आहेत. घरातील माणसांनाही या पक्षांची जणू आता सवयच झाली आहे. अशाच कोल्हापूरातील एका अपार्टमेंटमधील चिमणी व तिच्या छानशा पिल्लांचे घरकुल टिपले आहे आमचे छायाचित्रकार संजय देसाई यांनी.

Category

🗞
News

Recommended