• 6 years ago
ज्योतिबा डोंगर गुलालाने न्हाऊन निघालेला असतो हलगी पिपाणी चा आवाज टिपेला पोहोचतो. सासनकाठी नाचवणारा त्या तालावर उसळी मारून नाचत असतो. पण आपल्या दारातला हा सारा माहोल पाहायला डोंगरावरच्या माता-भगिनींना वेळ नसतो कारण सतत भक्तांची ये-जा आणि त्यांना प्रसाद करून खाऊ घालने .यातच त्यांचा वेळ जातो त्यामध्ये खास वैशिष्ट असलेली नैवेद्याची पुरणपोळी या पुरणपोळीचा व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला वेध...

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Category

🗞
News

Recommended