• 6 years ago
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्या कमलबाई उत्तम मोरे यांची आज (ता.४) दुपारी साडेबाराला बिनविरोध निवड झाली. उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सलीम पठाण होते. ग्रामविकास अधिकारी पी.बी.मोराणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सतरापैकी नऊ सदस्य हजर होते. उपसरपंच कमलबाई मोरे यांनी यापूर्वी तनिष्का गटात सदस्या म्हणूनही काम केले आहे. सरपंच पठाण, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांनी 'सकाळ'शी संवाद साधला!

(व्हिडिओ : प्रा.भगवान जगदाळे)
.
.
#Dhule #Maharashtra #MaharashtraNews #Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #MarathiVideos

Category

🗞
News

Recommended