फलटण शहर : फलटण शहर व तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाचे सावट दूर व्हावे यासाठी येथील व्यापारी प्रदीपशेठ दोशी यांच्या निवासस्थानी 'आचार्य मुनि पुंगव मानतुंगस्वामी' यांच्या 'महामृत्युंजयी भक्तामर स्तोत्रांचे' वाचन त्यांच्या सर्व कुटूंबियांनी सामुहिकपणे दिवसभरात पाच वेळा केले. यामध्ये त्यांच्या ९० वर्षीय मातोश्री माणिकबाई दोशी, पत्नी कांचन दोशी, मुलगा सागर दोशी, सुन शुभांगी दोशी, नातु वीर दोशी यांचाही समावेश होता. यावेळी त्यांच्या मातोश्री माणिकबाई दोशी यांनी मांसाहार टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID2019 #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID
#coronavirus #CoronaVirusUpdates