• 6 years ago
महामारीतही सुखद - गुन्हेगारी थांबली; अपघातात लक्षणिय घट
--
मनोज साखरे
----
औरंगाबाद - कोरोना (कोवीड -१९) विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर समस्त पोलिस बांधव रस्त्यावर पहारा देत आहे. अशा स्थितीत नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय पर्याय नसल्याने गुन्हेगारही घरात आहेत; त्यामुळे औरंगाबादेतील गुन्हेगारी कमालीची घटली आहे. वाहनांची चाके थांबल्याने आठ दिवसात एकाचाही मृत्यु झाला नाही हे सुखद आहे.
--
शहरातील गुन्हेगारी संबंधी ‘सकाळ' ने एक सर्वेक्षण केले. तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यात मिळून दाखल गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की ‘जनता कर्फ्यू‘ नंतर आणि राज्यशासनाने लॉकडाऊन केल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत नगण्य झाले आहे. २२ मार्च ते २८ मार्च या सात दिवसांच्या कालावधीमध्ये शहरात केवळ १८ गुन्हे दाखल झाले आहेत.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #lockdown #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Category

🗞
News

Recommended