संचारबंदीत बाहेर फिरताय मग खावे लागणार दंडे
जळगाव/मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली तरीदेखील नागरिक बाहेर फिरत असून रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे; मेहुनबारे येथील बसस्थानक परीसरासह सचांर बंदीमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरीकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिंन बेंद्रे यांच्यासह पोलीस पथकाने चांगलाच प्रसाद दिला.