नवेली देशमुखचे युवकांना आवाहन
औरंगाबाद ः राष्ट्रीय सेवा योजनेची राज्याची ब्रँड ॲम्बेसेडर आणि निवडणूक आयोगाची डिस्ट्रिक्ट यूथ आयकॉन नवेली देशमुख हिने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सोशल मीडियाद्वारे युवकांशी संवाद साधून कोरोनाला गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेची स्वच्छतादूत असल्यामुळे नवेलीने स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे किमान मास्क, सॅनिटायजर आणि हातमोजे नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली.