• 6 years ago
यवतमाळ : कधीकाळी डोंगरमाळाच्या कुशीत वसलेले यवतमाळ हे शहर अलीकडे कॉंक्रिटचे जंगल झाले आहे. प्रदूषित व अस्वच्छ शहराच्या यादीत हे शहर आले होते. परंतु, कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमुळे रस्त्यांवरील गर्दी थांबली. प्रदूषण कमी झाले आणि शहराने पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेतला. ऑक्‍सिजनच्या शोधात सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता घरीच ऑक्‍सिजन मिळू लागले आहेत. हॉर्नचा आवाजच नसल्याने ध्वनिप्रदूषण थांबले आहे. जीवन घरात बंद झाले असले तरी जगणे मात्र हवेहवेसे झाले आहे. यवतमाळचे हे नयनरम्य व्हिडिओ टिपले आहेत राजेश शर्मा व प्रसाद नायगावकर यांनी.

#DroneCamera #YavatmalCity #Vidarbha #SakalNews #MarathiNews #Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Category

🗞
News

Recommended