• 6 years ago
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा येथे दोन महिन्यांपूर्वी अद्रक काढण्यासाठी आलेले मध्यप्रदेश येथील कामगार कोरोनामुळे अडकले. एकूण 150 मजुरांची आता ना हाताला काम, ना खायला काही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत शासनाने ना राशन दिले, ना मेडिकल सुविधा. त्यामुळे हे मजूर पायी निघण्याच्या तयारीत आहेत. शासनाकडून लवकरात लवकर राशन व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी त्या कामगारांची आहे.

(व्हिडिओ : सुनील पांढरे)

Category

🗞
News

Recommended