चिखली (जि. बुलडाणा) : शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार स्थित असलेल्या मच्छी बाजारातील भंगाराच्या दुकानांमध्ये आज दुपारी अचानक आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वत्र सामसूम असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news