• 6 years ago
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शेतीमाल, भाजीपाला फळांसारख्या नाशवंत आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेऊ असं शासनाने स्पष्ट संकेत दिलेत. शेतकरी उत्पादक गटाद्वारे औरंगाबादेत ते अगदी व्यवस्थित सुरु आहे. भाजीपाला पुरवठ्यची साखळी यानंतरच्या काळातही टिकून राहणे आवश्‍यक आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स ठेऊन भाजीपाला विक्री कसा करायचा याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे. ‘सकाळ’च्या भुमिकेनंतर यात आणखी सकारात्मक बदल करण्यात आलेले दिसत आहेत. जमनालाल बजाज ग्रामीण विकास संस्थेने एका एनजीओमार्फत तीन शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून २२ लाख रुपयांचे भांडवल देऊन आपात्कालीन परिस्थितीत भाजीपाला पुरवठा साखळी तयार केली आहे. भाजीपाला जास्त न हाताळता ग्रेडिंग, पॅकिंग करुन देण्यास सुरवात केली आहे. पुरेशी काळजी घेऊन उत्पादनक्षमता सुरु ठेवणे गरजेचे आहे. ‘सकाळ’ने याबाबत मांडलेली भुमिका रास्तच आहे, मी या भुमिकेसोबत आहेय.
- उदय देवळाणकर, कृषीतज्ज्ञ.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended