• 6 years ago
औरंगाबाद : उन्हाळ्याची चाहूल लागली की गरिबांचा फ्रिज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना मागणी वाढते. दुरवरून कुठूनतरी माती आणायची, तीचा चिखल करून चांगला डवायचा, गरगरत्या चाकावर मातीचे गोळे ठेऊन त्याला कुशलतेनं आकार द्यायचा. कच्च्या मडक्यांना आव्यात (भट्टीत ) भाजून माठ, रांजण, लोटके, बोळके मोठ्या कष्टानं तयार करायचं आणि ते विकल्यानंतर घरसंसार चालवायचा. मात्र लॉकडाऊनमुळे अख्खा उन्हाळा निघून जातोय. स्वतः आकार दिलेल्या मडक्यांकडं एकटक पाहत बसण्याशिवाय सध्या तरी या कुंभार समाजापुढं काही पर्यायच उरला नाही.
(व्हिडिओ : मधुकर कांबळे )

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #Covid19 #Corona

Category

🗞
News

Recommended