कोरोना व्हायरसने सध्या जगभर धुमाकूळ घातलेला असतानाच राज्यात मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. कोरोनाच्या सावटात मुख्यमंत्री ठाकरे यांना कोणत्याही एका विधिमंडळाचे सदस्य होता येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मंत्रीमडळाने त्यांच्या आमदारकीबाबत राज्यपालांकडे शिफारस केली असली तरी राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे राजकारण तापले असून नेमकं काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच सोशल मीडियाच्या फेसबुकवर एक पोल घेण्यात येत आहे. त्यामध्ये असं म्हटलं की ‘या महाराष्ट्राने दोन मुख्यमंत्री बघितले आहेत, एक पुरातले आणि एक कोरोनातले. तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?’
https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/poll-social-media-maharashtra-cm-post-285296
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news