लॉक डाऊन उठल्याशिवाय वाहन ताब्यात नाही..
शहर वाहतूक नियंत्रण शाखा राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाणे यांनी संचालक बंदीच्या काळात सुमारे पाच हजाराहून अधिक वाहने जप्त केली. दररोज संबंधित वाहन चालक साहेब आमचा दंड भरून घ्या आणि आमचे वाहन आमच्या ताब्यात द्या अशी मागणी वारंवार करत आहेत यावर औषध म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेटवरच लॉक डाऊन संपल्याशिवाय वाहन ताब्यात नाही असा फलक लावला आहे. वाहने कशी ताब्यात घ्यायची याबाबतचे नियोजन सुरू आहे
बातमीदार : राजेश मोरे