नाशिक : नाशिक आणि मालेगाव मध्ये कोरोना रुग्ण वाढत होते. पण टेस्ट पुणे अथवा धुळ्याला होत असल्याने नाशिक मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब व्हावी ही मागणी 'सकाळ'ने लावून धरली. मविप्र च्या डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आज दुपारी प्रत्यक्ष टेस्टिंगला सुरवात झाली.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लॅबचे अनौपचारिक उदघाटन करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, दातार जेनिटिक्स चे प्रमुख राजन दातार आदी उपस्थित होते.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #corona #testlab #coronavirus