• 6 years ago
नंदुरबार : नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पहिल्या रुग्णासह त्याच्या कुटुंबियांसह चौघे कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांचा चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी घेतलेले स्वब निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सर्वांना आज जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यातील जेष्ठ महिलेने 'मै सब के लिये दुवा करूगी, सब ठीक होंगे' असे भावपूर्ण उदगार काढत सर्वांचे आभार मानले.

Category

🗞
News

Recommended