• 6 years ago
आज नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी हजारो नव्हे तर लाखो लोक शहराकडे धावत आहेत. औद्योगीक क्षेत्रात जावून राहत आहेत. मात्र शिरोळ तालुक्‍यातील एक गाव असं आहे जेथील तरुणांना रोजगारासाठी गावाची वेस ओलांडावी लागत नाही. गावातच एवढे उद्योग आणि रोजगार निर्माण केला आहे की बाहेरील गावातील लोकांना हे गाव रोजगार देतं. आज या गावात किमान 1500 ते 2 हजार लोकांना विविध उदयोगात रोजगार देण्यात आला आहे. अशा या अनोख्या गावाचे नाव आहे टाकवडे. इचलकरंजी या वस्त्रनगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावांत बहुविध व्यवसाय आहेत. या ठिकाणी खताच्या कंपीनपासून ते बेकरी, दुग्ध, यंत्रमाग, काजू असे एक ना अनेक उद्योग आहेत. टाकवडेचा हा उद्योगी बाणा इतर गावांसाठी व नवउदयोजकांसाठी प्रेरणा देणारा आहे.

बातमीदार - सदानंद पाटील
व्हिडिओ - बी.डी.चेचर

#kolhapur #lockdown #industry #mployment

Category

🗞
News

Recommended