• 6 years ago
अकोला : कोरोना संसर्गाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला टप्प्या-टप्प्याने उठवण्याचे जाहीर करत शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले आहे. त्याअंतर्गत नियम व अटींच्या अधीन राहून व्यापारी प्रतिष्ठाने सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु मिशन बिगीन अगेनला शुक्रवारी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखवल्याचे दिसून आले. गत 70 दिवसांपासून घरात कोंडलेले नागरिक खरेदीसाठी व कामानिमित्त घराबाहेर पडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा सम-विषय नियमाला धाब्यावर बसवले. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना संसर्ग कमी होण्यायेवजी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
#COVID19 #CoronaVirus #Lockdown #Unlock #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Viral #Breaking

Category

🗞
News
Comments

Recommended