कोल्हापूर - बेंदरानिमित्त आज घरोघरी बैलांची पूजा झाली. एरवी शेतकामात रमणाऱ्या या सर्जा-राजांच्या जोड्या नटल्या आणि त्यांच्या सवाद्य मिरवणूकाही निघाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत यंदा साध्या पध्दतीने या मिरवणूका निघाल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पारंपरिक कर तोडण्याचे कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आले.
बेंदरानिमित्त सकाळपासूनच घरांघरांत धांदल सुरू झाली. एकीकडे पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू असतानाच दाराला पिंपळाच्या पानांची तोरणं बांधण्याची लगबगही सुरू झाली. त्याचवेळी मृग नक्षत्र असल्याने शेवग्याच्या भाजीची तयारीही सर्वत्र सुरू राहिली. सकाळीच शहर परिसरातील विविध तलाव आणि पंचगंगा घाट परिसरात बैलांची शिंगे रंगवून व विविधरंगी झूल पांघरून त्यांना सजवण्यात आले. त्यानंतर मिरवणूकांना प्रारंभ झाला.
व्हिडीओ - बी.डी.चेचर