कोल्हापूर : नदी, नाला, ओढ्याच्या काठांची मातीची धूप थांबविणारा हा वाळूंज आता कमी प्रमाणात जिल्ह्यातील नद्यांच्या काठाला दिसत आहे. याला ग्रामीण भाषेत "बच्चा' असे म्हणतात. खरेतर हा आहे वाळूंज. पंचगंगा नदीकाठ, जयंती (नदी) नाल्याकडेला ही वाळूंजची काही झाडे दिसतात. वाळूंजचे संरक्षण अन् संरक्षण केले तर नदीकाठ व्यवस्थित राहील. जिथे वाळूंजची झाडे नाहीत, तेथील नदीकाठ विस्कळीत झालेला दिसतो. शिवाय नदी ही कुठेही आपले पात्र बदलत जाते. याचा फटका नदीकाठ असलेल्या शेतींवर होतो. म्हणून प्रत्येकाने वाळूंजची लागवड, जोपासना केली पाहिजे; तरच जिल्ह्यातील नदीकाठ सुरक्षित राहतील. चला तर मग या पावसाळ्यात वाळूंजची लागवड प्रत्येक ठिकाणी करु या. एक लक्षात घ्या, वाळूंजचे आयुर्वेदिक महत्व खूप आहे. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर आपल्याला वाळूंजबद्दल अधिक माहिती देतील.
रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ : नितीन जाधव