• 6 years ago
अकोला : सध्या सापांच्या प्रणयाराधनेचा काळ आहे. मागील तीन-चार दिवसांत पावसामुळे उकाडा कमी झाला आहे. हा वातावरणातील बदल सापानाही प्रणयक्रीडेसाठी अनुकूल आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे हे साप प्रनयक्रीडेत रमले आहेत. हा प्रसंग कॅमेराबद्ध केलाय सकाळचे छायाचित्रकार अमित गावंडे यांनी. ते मंगळवारी सायंकाळी शेतात गेले असता साप प्रणयक्रीडा करताना दृष्टीस पडले. हा सापांच्या मिलनाचा क्षण त्यांनी खासकरून ‘सकाळ’च्या वाचक व प्रेक्षकांसाठी कॅमेराबद्ध केला आहे.

Category

🗞
News

Recommended