कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले विडी कारखाने मंगळवारी कामगारांच्या गर्दीने फुलून गेले.
पूर्व भागातील गांधी नगर येथील लंगर विडी कारखान्यात मंगळवारी सकाळी नऊपासूनच महिला विडी कामगारांनी कारखान्यात हजेरी लावली. कारखान्यातील विडी चेकर व व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेत त्यांना पान व तंबाखूचे वितरण केले. आलेल्या कामगारांना सॅनिटायझर देऊन त्यांचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरने तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. (व्हिडीओ : श्रीनिवास दुध्याल)
#sakalnews #viral #marathinews #trending #sakalmedia