कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने 50 रुपये जादा दर दिल्याचा दाखला देणाऱ्या शेतकऱ्यांना थेट घारेपडे कारखान्याचे काटे तपासा असा सल्ला देत या वजन काट्याबद्दल माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शंका व्यक्त केली. ते वजनात काटा मारतात, त्यांच्या कारखान्याच्या दराबाबत काही बोलू नका, अशा शब्दात महादेवराव महाडिक यांनी ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर निशाना साधला.